Belagavi

बेळगावात शासकीय पातळीवर शिवजयंती उत्साहात

Share

 हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंती बेळगावात आज उत्साहात साजरी करण्यात आली.

बेळगाव महानगरपालिका, कन्नड आणि संस्कृती खाते यांच्या संयुक्त विध्यमाने शासकीय पातळीवर शनिवारी शहापुरातील शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याची विशेष पूजा करण्यात आली.

फुले अर्पण करून महाराजांना अभिवादन केले. यावेळी बेळगावच्या खा. मंगल अंगडी, उत्तरचे आ. अनिल बेनके, दक्षिणचे आ. अभय पाटील, बेळगाव नगरविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय बेळगावकर, पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर, नगरसेवक नितीन जाधव, गिरीश धोंगडी, राजू भातकांडे, कन्नड व संस्कृती खात्याच्या सहायक संचालिका विध्यावती बजंत्री, पालिका अधिकारी व कर्मचारी तसेच शिवप्रेमी उपस्थित होते.

Tags: