Khanapur

खानापुरात छत्रपती शिवरायांना अभिवादन

Share

 युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती आज खानापूर तालुका प्रशासन आणि जनतेच्या सहकार्याने उत्साहात साजरी करण्यात आली.

होय, खानापूर तहसील कार्यालयात शनिवारी तालुका प्रशासन आणि जनतेच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९२ वी जयंती श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी तहसीलदार प्रवीण जैन यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे विशेष पूजन करून अभिवादन केले.

त्यानंतर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या शिवस्मारकासमोरील शिवरायांच्या पुतळ्याला तहसीलदार प्रवीण जैन आणि आ. डॉ. अंजली निंबाळकर, नगराध्यक्ष मजहर खानापुरी, नगर पंचायत स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश बैलुरकर आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी खानापुरातील विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags: