दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकविण्याचे विधान करणाऱ्या मंत्री के एस ईश्वरप्पा यांच्यावर निशाणा साधत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी भाजप भारताचे नाव देखील बंडू शकते असा टोला लगावला आहे.

: बेळगाव शहरात काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते. दिल्ली येथील लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकविण्याचे विधान करणारे मंत्री के एस ईश्वरप्पा यांच्या विरोधात सभागृहात अहोरात्र धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी मंत्री के एस ईश्वरप्पा यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी सतीश जारकीहोळी यांनी राज्यात सुरु असलेल्या हिजाब विवादासंदर्भात देखील प्रतिक्रिया नोंदविली असून विद्यार्थी, पालक आणि शाळा महाविद्यालय प्रशासनाने संगनमताने यावर निर्णय घ्यावा, आणि हा प्रकार सरकारने तातडीने आटोक्यात आणावा असा आग्रह जारकीहोळी यांनी केला.
सभागृहात सुरु असलेल्या कामकाजामध्ये राष्ट्रीय पक्षांमुळे गोंधळ निर्माण होत आहे. सभागृहात किती खर्च येतो हे माहित आहे का असे विचारणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. तसेच आपल्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांचा निषेध देखील केला.
मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ काँग्रेसने धरणे आंदोलन छेडले आहे. विरोधी पक्षांकडून त्यांच्या विधानावर रोष व्यक्त केला जात असून त्यांना बडतर्फ करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सरकार आता ईश्वरप्पा यांच्या विधानाबाबत कोणती भूमिका घेईल हे पाहावे लागेल.


Recent Comments