कोविड आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी आधीच संकटांचा सामना करत आहेत. सरकार शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी जबरदस्ती करत नाही. परंतु बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीसाठी नोटीस बजाविण्यात येत आहेत, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा लिलाव करण्यात येत आहे. आपल्याला या प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी अखंड कर्नाटक शेतकरी संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आली.

राज्यात गेल्या ३ वर्षांपासून शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेली कर्जाची परतफेड करणे आता सध्या तरी शेतकऱ्यांना शक्य नाही. परंतु काही सहकारी संस्था आणि बँकांकडून कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावण्यात येत आहे. शिवाय शेतकऱ्यांना नोटिसी पाठवण्यात आल्या आहेत.
चलवेनहट्टी गावातील शेतकरी ओमाणी हुंदरे या शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज घेतले होते. ट्रॅक्टरचे हप्ते थकल्याने सदर बँकेकडून ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आली आहे. आपण हप्ते भरण्यास तयार असून ट्रॅक्टर आपल्याला परत द्यावी, असा आग्रह शेतकऱ्याने केला. परंतु सदर ट्रॅक्टरचा लिलाव झाल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. लिलावासंदर्भात माहिती विचारण्यात आल्यास उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्याने केला असून आपल्याला या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी अखंड कर्नाटक शेतकरी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात झालेला सारा प्रकार शेतकरी नेत्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितला असून आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळावा अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच पुराचा सामना, अतिवृष्टीचा सामना करत शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती व्यवसायासाठी बँक आणि सहकारी संस्थांकडून घेण्यात आलेल्या कर्जाच्या परतफेडीचा तगादा लावण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे मदतीचा आग्रह केला आहे.


Recent Comments