अथणीत अनुसूचित जाती-जमातीसाठी समस्या निवारण बैठक आयोजित करण्यात आली होती.

: शुक्रवारी अथणी तालुका पंचायतीच्या सभागृहात अनुसूचित जाती – जमाती साठी समस्या निवारण बैठक बोलाविण्यात आली होती. समाज कल्याण विभाग आणि तालुका प्रशासनाच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी नागरी अधिकारी संचालनालयाचे अधिकारी बी.एस. भालचंद्र यांनीं एससीपी आणि एसटीपी योजने अंतर्गत अनुसूचित जाती – जमाती साठी मंजूर होणाऱ्या अनुदानाचा सदुपयोग करून अनुसूचित जाती – जमातीचे कॉलनीचा विकास करण्यासाठी अधिकाऱ्याना लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला .
अथणी तालुक्यातील काहीं गावांमध्ये दलितांना स्मशानभूमीची सोय नाही. सदर बाब अनेकदा अथणी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे .पण अद्याप या समस्येचे निराकरण करण्यात आले नाही असा आरोप दलित प्रमुख महांतेश बाडगी आणि वकील राम मरळेर यांनीं केला. निवेदनाचा स्वीकार करून तहसीलदार दूंडाप्पा कोमार यांनी लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.


Recent Comments