Chikkodi

लक्ष्मण सवदी यांचा वाढदिवसाप्रित्यर्थ पाणी टाकीचे लोकार्पण

Share

अथणी नगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ३ मधून विजयी झालेले नूतन नगरपालिका सदस्य संतोष आवडकर यांनी निवडणुकीनंतर काही दिवसातच आपण दिलेल्या आश्वासनांनुसार सुमारे ५ हजार क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची उभारणी केली. आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले.

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या ६२ व्या जन्मदिनाच्या औचित्याने या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले असून नवनिर्वाचित नगरपालिका सदस्य संतोष सावडकर यांच्या स्वखर्चातून सदर टाकीची निर्मिती करण्यात आली आहे. शहरातील शंकर नगर येथे या पाण्याच्या टाकीची निर्मिती करण्यात आली असून यासंदर्भात माहिती देताना चिदानंद सवदी म्हणाले, निवडणुकीदरम्यान पाण्याच्या टाकीच्या निर्मितीचे आश्वासन देण्यात आले होते. यानुसार निवडणूक संपल्या नंतर पाण्याची टाकी निर्माण करण्यात आली असून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आल्याची माहिती सवदी यांनी दिली.

नगरपालिका सदस्य संतोष सावडकर बोलताना म्हणाले, माझ्या आवडत्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले आहे. जनतेने याचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या भागातील ७० कुटुंबांना अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या होती. याचा विचार करून या पाण्याच्या टाकीची निर्मिती करण्यात आल्याचे सावडकर म्हणाले. पाण्याच्या समस्येसह इतर सुविधा पुरविण्यासाठीही मी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी दिले. (बाईट)

यावेळी नगरपालिका सदस्य कलमेश मडली, डॉ. विश्वनाथ चिम्मड, डॉ . सादीक गलगली, विनोद सावडकर, विशाल सगरी, महांतेश ठक्कण्णावर, सुशांत पत्तर, महादेव सगरी, शिवानंद पाटील, अभय सगरे सुशांत साळुंके, सचिन मिर्जी, सौरभ पाटील, अनिल महाजन, वीराण्णा हळ्ळी, नागाप्पा बागडी, राहुल बल्लोळ्ळी, ईश्वर कोळी, सिद्दप्पा सत्ती, गणेश पाटील, आनंद माळी आदी उपस्थित होते.

Tags: