राज्यातील हिजाब वाद शांत होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. दिवसेंदिवस या प्रकरणी नवनवी वळणे लागत असून आता बेळगावमधील सामाजिक कार्यकर्त्या सीमा इनामदार यांना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सीमा इनामदार यांनी सायबर क्राईम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

हिजाब विवाद प्रकरणी केवळ विविध आंदोलने, वर्ग – परीक्षेवर बहिष्कार घालणे इतक्याच गोष्टी होत नसून आता बेळगावमधील सीमा इनामदार नामक सामाजिक कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका अनोळखी व्यक्तीने वॉट्सऍपच्या माध्यमातून आझादी आणि हिजाब विचाराचे समर्थन केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप करत बेळगावच्या सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली आहे. हि तक्रार मार्केट पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आली आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सीमा इनामदार यांनी सांगितले कि आपल्याला फोनच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हिजाबचं जाहीरपणे समर्थन केल्याने आपल्याला अशी धमकी देण्यात येत असल्याचे सीमा इनामदार यांनी सांगितले.
यासंदर्भात इम्रान पिरजादे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले कि, सीमा इनामदार या सरकारी महाविद्यालयात काल गेल्या होत्या. बेळगावमधील सरकार महाविद्यालयात जाऊन आल्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास त्यांना एक फोन कॉल आला . वीरभद्रनगर येथे काही युवक संशयास्पदरित्या वावरत असल्याचे आपल्या निदर्शनास आले होते. यामुळे या युवकांनीच हा फोन कॉल केल्याचा संशय बळावत असल्याचे इम्रान पिरजादे म्हणाले.

धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन तातडीने त्याला अटक करावी आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा आग्रह करण्यात आला आहे. हिजाब प्रकरणी संपूर्ण राज्यासह आता बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हिजाब प्रकरणी सुरु झालेल्या वादामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने यावर रोख लावण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्याची गरज आहे.


Recent Comments