हिजाब विरोध भगवा वादातून बंद ठेवण्यात आलेली महाविद्यालये आजपासून पुन्हा सुरु झाली. या पार्श्वभूमीवर बेळगावातील कॉलेजच्या गेटजवळ थांबून पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली.
: होय, हिजाब विरोध भगवा वादातून बंद ठेवण्यात आलेली महाविद्यालये आजपासून पुन्हा प्रारंभ करण्यात आली. त्यामुळे बेळगावात खबरदारी घेत सर्व महाविद्यालयांच्या फाटकांसमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रयेक कॉलेजच्या गेटजवळ ४ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. 
धर्माशी संबंधित कसल्याही प्रकारची वस्त्रे परिधान करून कॉलेजात येऊ नये असा अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने बजावला आहे. तरीही आज कॉलेज पुन्हा सुरु झाल्यावर बेळगावातील काही कॉलेजच्या विद्यार्थिनी हिजाब घालून आल्या होत्या. शहरातील लिंगराज कॉलेजमध्ये ही घटना घडली. मात्र त्यांनी कॉलेजमधील स्वतंत्र खोलीत हिजाब उतरवून वर्गात प्रवेश केला. यावेळी काही विद्यार्थिनीनी कॉलेजच्या कर्मचाऱ्यांशी वादही घातला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे लिंगराज कॉलेजसमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. यावेळी बोलताना हिजाब आमचा अधिकार आहे, तो कोणीही काढून घेऊ शकत नाही. आम्ही कोणत्याही कारणास्तव हिजाब घालणे बंद करणार नाही असे त्यांनी सांगितले. बाईट
याची माहिती मिळताच कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पालक आणि विद्यार्थिनींची समजूत घातली. उच्च न्यायालयाचा आदेश पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments