Vijayapura

विजापुरात उच्च न्यायालयाचा अवमान; शिक्षिका-विद्यार्थिनी हिजाब घालून शाळेत

Share

धार्मिक वस्त्रे परिधान करून शाळामहाविद्यालयात जाऊ नये असा अंतरिम आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. तरीही हिजाब घालून मुलींना शाळेत पाठविल्याची घटना विजापुरातील सरकारी उर्दू प्राथमिक शाळेत घडली आहे.

होय, केवळ विध्यार्थिनीच नव्हे तर शिक्षिकाही हिजाब घालून शाळेत हजर झाल्याची घटना विजापुरात घडली आहे. शाळेच्या प्रार्थनेतही शिक्षिका आणि विद्यार्थिनी हिजाब घालूनच सहभागी झाल्या होत्या. तर विध्यार्थी टोपी घालून शाळेला आले होते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या आधी कधीही या शाळेत विद्यार्थिनी किंवा शिक्षिका प्रार्थना म्हणताना हिजाब घालत नसत. याबाबत आम्हाला कसलाच आदेश आलेला नाही, तो आदेश केवळ महाविद्यालयाना लागू आहे असे एका शिक्षकाने सांगितले. 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गट शिक्षणाधिकारी एम. बी. होरटगी यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. येथील परिस्थितीची पाहणी केली आहे, याबाबत डीडीपीआयना अहवाल देणार आहे असे त्यांनी सांगितले. मात्र याबाबतच्या अन्य प्रश्नांना उत्तर देणे त्यांनी टाळले. बाईट

एकंदर, उच्च न्यायालयालयाने हिजाबबाबत अंतरिम आदेश देऊनही त्याचा अवमान केल्याची घटना विजापुरात घडली आहे. त्यामुळे टीकेची झोड उठली आहे.

 

 

Tags: