बेळगावात मंगळवारी संत सेवालाल यांची जयंती साधेपणाने पण अर्थपूर्णरित्या साजरी करण्यात आली.

बेळगावातील कुमार गंधर्व रंगमंदिराच्या आवारातील बसवराज कट्टीमनी हॉलमध्ये सेवालाल यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सेवालाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून नमन केले. 
यावेळी बोलताना कन्नड व संस्कृती खात्याच्या सहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री यांनी संत सेवालाल यांच्या जीवनकार्याचा माहिती दिली. त्यांची जयंती भव्य प्रमाणात साजरी करायची होती. मात्र काही कारणामुळे ते शक्य झाले नाही असे सांगून जीवनात सेवालाल यांचा आदर्श ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खा. मंगल अंगडी, अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, एम. टी. राठोड, आर. टी. राठोड, प्रभू राठोड, मंजुनाथ पम्मार, अशोक पुजारी, शिवानंद चव्हाण, पी. बी. नायक आदी उपस्थित होते.


Recent Comments