Belagavi

बेळगावात कन्नड गीतगायन कार्यक्रम

Share

 बेळगावातील राणी चन्नम्मा नगरातील निवेदार्पण अकादमीतर्फेहाड़ू कन्नड नलीदाडु कन्नडसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावातील कोंवळा गल्लीतील लोकमान्य सांस्कृतिक भवनात रविवारी सायंकाळी या गायन कार्यक्रमात ४० गायक-गायिकांनी कन्नड गीते गायिली. त्यातील ५ उत्कृष्ट गायकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे कन्नड संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन केले. गायिका आणि अकादमीच्या प्रमुख निवेदिता चंद्रशेखर व इतरांनी सूत्रसंचालन केले. सुमारे २ तास चाललेल्या या कार्यक्रमात अनेक बहारदार कन्नड गीते सादर करण्यात आली.

 

Tags: