Chikkodi

इंगळी पीकेपीएसच्या अध्यक्षपदी डॉ. अजित चिगरे, मारुती पवार उपाध्यक्ष

Share

इंगळी प्राथमिक कृषी पत सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. अजित चिगरे तर उपाध्यक्षपदी मारुती पवार यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.

चिक्कोडी तालुक्यातील इंगळी पीकेपीएसच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी डॉ. अजित चिगरे तर उपाध्यक्षपदी मारुती पवार यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी सहकार खात्याचे चिक्कोडी येथील अधिकारी सतीश मुचंडी यांनी निवडीची घोषणा केली. त्यानंतर बोलताना नूतन अध्यक्ष डॉ. अजित चिगरे म्हणाले, सर्व संचालक आणि सदस्यांच्या सहकार्याने संस्थेच्या प्रगतीसाठी परिश्रम घेईन. राज्य सरकारच्या योजनांचा संस्थेच्या माध्यमातून सभासदांना लाभ मिळवून देण्यात येईल.

त्यानंतर उपाध्यक्ष मारुती पवार म्हणाले, आम्ही सर्व संचालक, सभासदांना विश्वासात घेऊन चांगले प्रशासन देऊ. यावेळी भीमू संगमे, राजाराम माने, सुनील पाटोळे, हुवण्णा चौगुले, सुभाष घोसरवाडे, सुभाष जुगळे, बेबीताई शिंदे, बसप्पा कांबळे,धोंडिबा पवार, चंद्रकांत लंगोटे, सुभाष उन्नाळे, अन्नसाब डिग्रजे, मोहन पाटील आदी उपस्थित होते.

 

Tags: