Belagavi

जिल्हा व्हेजिटेबल ग्रोव्हर्स, सेलर्स अँड परचेजर्स सहकारी संस्थेवर आरोप

Share

बेळगाव जिल्हा व्हेजिटेबल ग्रोव्हर्स, सेलर्स अँड परचेजर्स या सहकारी पतसंस्थेत ग्राहकांनी गुंतविलेली रक्कम परतफेड करण्यात यावी, अशी मागणी भारतीय कृषी समाज राज्याध्यक्ष सिध्दगौड मोदगी यांनी केली आहे.

बेळगाव शहरातील सरकारी एपीएमसी परिसरात शेतकऱ्यांशी सिध्दगौडा मोदगी यांनी चर्चा केली. बेळगाव जिल्हा व्हेजिटेबल ग्रोव्हर्स, सेलर्स अँड परचेजर्स या सहकारी पतसंस्थेची १९९९-२००० साली सुरुवात झाली. या संस्थेचे कामकाज योग्यरितीने सुरु होते. यादरम्यान अनेक ग्राहकांनी या पतसंस्थेत विविध स्वरूपात रक्कम गुंतविली आहे. मात्र काही कालावधीनंतर संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे पतसंस्था अडचणीत आली. आणि त्यानंतर ग्राहकांना गुंतविलेले रक्कम परत मिळणे बंद झाले. या पतसंस्थेत बहुतांशी शेतकऱ्यांनी गुंतवणूक केली असून सदर गुंतवणुकीची रक्कम परत मिळावी अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते सिध्दगौड मोदगी यांनी दिला आहे.

या पतसंस्थेच्या संचालक मंडळाने सहकारी संघाच्या नियमनाचे उल्लंघन करून अव्यव्हार केल्याचे निदर्शनास येत आहे. संचालक मंडळाने सदर गुंतवणूकदारांची रक्कम परत करावी, असा आग्रह करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची रक्कम परतफेड न केल्यास सर्व ग्राहकांसोबत संस्थेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

बेळगावमधील अनेक पतसंस्था अडचणीत आल्याचे निदर्शनास येत आहे. यामागे केवळ संचालक मंडळाचे दुर्लक्ष होत आहे असे नाही तर या करणासहित कर्जदारांची कर्ज बुडविण्याची मानसिकताही कारणीभूत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ठेवीदारांनी गुंतवलेली रक्कम आणि कर्जदारांनी थकीत ठेवलेले कर्ज याचा ताळमेळ न झाल्याने अनेक पतसंस्था आज अडचणीत येत आहेत. हा सारा प्रकार सहकारी संघाने मध्यस्थी करून तातडीने यावर तोडगा काढण्याची नितांत आवश्यकता आहे.

Tags: