शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी रिक्षा उलटल्याने ३ विध्यार्थी जखमी झाले. ही दुर्घटना बेळगावातील ऑटो नगरातील सुरभी हॉटेलजवळ घडली.
बेळगावातील कणबर्गी रोडवरील ऑटोनगरातील सुरभी विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी रिक्षा आज, सोमवारी सकाळी उलटली. त्यामुळे रिक्षात बसलेले ३ विद्यार्थी जखमी झाले. 
जखमी विद्यार्थ्यांना तातडीने ऍम्ब्युलन्समधून जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. जखमी विद्यार्थी केंद्रीय विद्यालयाचे विध्यार्थी असून, अपघाताचे नेमके कारण व अधिक माहिती मिळवायची आहे. वाहतूक पोलिसात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments