Vijayapura

विजापूमध्ये अतिक्रमणावर कारवाई अतिक्रमण झालेल्या २९ घरावर जेसीबी महानगर पालिकेने हाती घेतली कारवाई

Share

विजापूर शहरात आज सकाळी महानगर पालिकेच्या वतीने अतिक्रमण झालेल्या २९ घरांवर जेसीबी चालविण्यात आली. विजापूर शहरातील अथणी मार्गावरील शास्त्री नगर येथे हि कारवाई करण्यात आली.

पालिका आयुक्त विजयकुमार मेक्कळकी यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आलेल्या या कारवाईत तीन जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमित झालेली २९ घरे पदविण्यात आली. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी संबंधित विघाच्या अधिकाऱ्यांकडून नोटीस बजाविण्यात आली होती.

सर्व्हे क्रमांक ६७२ मध्ये मोठ्या प्रमाणात घरांचे अतिक्रमण झाले होते. सदर कारवाई हाती घेण्यापूर्वी याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईनंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. शिवाय या घरांवर कारवाई केल्यानंतर घरमालकांनी नाराजी व्यक्त केली.

Tags: