Accident

बसने मोटरसायकलला धडक दिल्याने बालिका जागीच ठार; पिता गंभीर

Share

बसने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बालिका जागीच ठार तर पिता गंभीर जखमी झाला. हा अपघात चिक्कोडी तालुक्यातील नवनिहाळ क्रॉसवर झाला.

चिक्कोडी तालुक्यातील नवनिहाळ क्रॉसवर बसने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अंजली सुनील तोडकर ही ७ वर्षांची बालिका जागीच ठार झाली, तर तिचे वडील सुनील तोडकर गंभीर जखमी झाले. सुनील याना बेळगावच्या केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक गावचे सुनील तोडकर आपली ७ वर्षीय मुलगी अंजली हिच्या सोबत चिक्कोडीला येत होते. नवनिहाळ क्रॉसवर त्यांच्या मोटरसायकलला बसने धडक दिली. या अपघातात अंजली जागीच ठार झाली तर तिचे वडील सुनील तोडकर गंभीर जखमी झाले आहेत. चिक्कोडीचे पीएसआय लक्ष्मण आरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

 

Tags: