Khanapur

खानापूरच्या जेडीएस नेत्याने घेतली इब्राहिम यांची भेट

Share

काँग्रेस सोडून जाण्याच्या तयारीत असलेले ज्येष्ठ नेते सी. एम. इब्राहिम यांची खानापूरचे जेडीएसचे युवा नेते अलीम अकबर नाईक यांनी हुबळीत भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

होय, निधर्मी जनता दलाचे युवा नेते आणि धारवाड येथील रॉयल किचनचे मालक अलीम अकबर नाईक यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यातील अल्पसंख्यांकांचे प्रभावी नेते सी. एम. इब्राहिम यांची हुबळी येथे नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसवर नाराज असलेले इब्राहिम जेडीएसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे अल्पसंख्यांक युवा नेत्यांमध्ये त्यांच्या पुढील वाटचालीसंदर्भात कुतूहल निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अलीम अकबर नाईक यांनी इब्राहिम यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचे समजते.

Tags: