Belagavi

विध्यार्थी वाहतूक करणारी रिक्षा उलटून ३ विध्यार्थी जखमी

Share

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी रिक्षा उलटल्याने विध्यार्थी जखमी झाले. ही दुर्घटना बेळगावातील ऑटो नगरातील सुरभी हॉटेलजवळ घडली.

बेळगावातील कणबर्गी रोडवरील ऑटोनगरातील सुरभी विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी रिक्षा आज, सोमवारी सकाळी उलटली. त्यामुळे रिक्षात बसलेले ३ विद्यार्थी जखमी झाले.

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने ऍम्ब्युलन्समधून जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. जखमी विद्यार्थी केंद्रीय विद्यालयाचे विध्यार्थी असून, अपघाताचे नेमके कारण व अधिक माहिती मिळवायची आहे.  वाहतूक पोलिसात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

 

Tags: