राज्यात उफाळून आलेल्या हिजाब वादामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील माध्यमिक शाळांना आजपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर विजापूरमधील विविध शाळांना आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी भेट दिली आहे.

विजापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक एच डी आनंदकुमार यांनी शहरातील दरबार हायस्कुल ला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वाद बाजूला ठेऊन शिक्षणाला महत्व देण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. पोलीस आयुक्तांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत धोरणात्मक जीवनाविषयी सल्ला दिला. जीवनात पुढे येण्यासाठी शिक्षणाची नितांत गरज असून शिक्षणामुळे भविष्य उज्वल होते, यामुळे विवाद बाजूला सारून केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. 
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एच. डी आनंदकुमार म्हणाले, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात आज सर्व माध्यमिक शाळांना सुरुवात झाली आहे. यासंदर्भात बीईओ, शिक्षक, शाळा प्रशासन, पालक तसेच सर्व स्थानिक नेत्यांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सदर वादाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे आनंदकुमार यांनी सांगितले.
यानंतर बोलताना जिल्हाधिकारी पी सुनीलकुमार म्हणाले, राज्यात आजपासून माध्यमिक शाळा सुरु झाल्या असून जिल्ह्यात शांतता आणि सुव्यस्वठा राखण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक स्वतः शाळेला भेट देण्यासाठी दाखल झाले आहेत. शाळांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे निदर्शनास येताच संबंधितांवर कारवाई करण्यासाठी सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.
विजापूर जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्तासह आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. कायदा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला असून पोलिसांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या बंदोबस्ताचे जनतेतून कौतुक करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शांतता अशीच अबाधित राखण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे.


Recent Comments