बेळगावातील आदर्शनगर, वडगाव येथील रहिवासी लीलादेवी चंद्रशेखर हुंबरवाडी यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. देहदान करून त्या मरणानंतरही अमर झाल्या आहेत.

होय, लीलावती हुंबरवाडी यांचे आजाराने निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान केले. बैलहोंगल येथील डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचा देह बेळगावातील केएलई संस्थेच्या जेएनएमसी मेडिकल कॉलेजला देण्यात आला. वैद्यकीय विध्यार्थ्यांना संशोधन करता यावा या हेतूने हा देह दान करण्यात आला. प्राचार्य डॉ. एन. एस. महांतशेट्टी, शरीर रचना विभागाच्या प्रमुख डॉ. शिल्पा यांनी मृतदेह स्वीकारून हुंबरवाडी कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. लीलादेवी यांच्या मागे पती, २ मुलगे, १ मुलगी असा परिवार आहे. त्या कॅनरा बँकेचे अधिकारी व कॅनरा बँक ऑफिसर्स असोसिएशनचे रिजनल सेक्रेटरी शिवानंद हुंबरवाडी यांच्या मातोश्री होत.


Recent Comments