बारमध्ये दारू मिळाली नाही म्हणून केलेला फोन उचलला नाही म्हणून चक्क आ. अनिल बेनके यांच्या कार्यालयावर एका मद्यप्रेमीने दगडफेक केल्याची घटना रविवारी रात्री बेळगावात घडली.
मद्यप्रेमाने केलेल्या दगडफेकीत आ. बेनके यांच्या कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत.याबाबतची माहिती अशी की, रविवारी रात्री ११च्या सुमारास एक मद्यपी बेळगावातील सीबीटीजवळील एका बार-रेस्टॉरंटमध्ये दारू पिण्यास गेला होता. मात्र वेळ संपल्याने त्याला दारू देण्यास व्यवस्थापकाने नकार दिला. त्यावेळी त्याने दारु मिळवण्यासाठी थेट आ. अनिल बेनके यांनाच फोन लावला. मत आ. बेनके यांनी तो उचलला नाही. त्यामुळे चिडलेल्या मद्यप्रेमी तेथून अर्धा किमी अंतरावर असलेल्या आ. बेनके यांच्या कार्यालयाकडे गेला आणि त्याने बंद असलेल्या कार्यालयावर दगडफेक केली. आ. बेनके यांचे कार्यालय असलेला चव्हाट गल्ली परिसर संवेदनशील मानला जातो. त्यामुळे तेथे नेहमी एक पोलीस वाहन तैनात केलेले असते. तशातही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


Recent Comments