Belagavi

डबल इंजिन सरकारचा जनतेशी डबल विश्वासघात! विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांचा आरोप राज्यपालांच्या भाषणातून सरकार खोटे बोलत असल्याची टीका

Share

डबल इंजिन सरकार राज्यातील जनतेचा विश्वासघात करत असून राज्यपालांच्या भाषणाच्या माध्यमातून खोटे बोलत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केलाय. संयुक्त विधानसभा अधिवेशनासंदर्भात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

राज्य सरकारच्या संयुक्त विधानसभा अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या भाषणावर सिध्दरामय्यांनी टीका करत कोविड व्यवस्थापनात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला शिवाय सरकार कोविड मृतांची आकडेवारी लपवत असल्याचेही सिद्धरामय्या म्हणाले.

यानंतर हिजाब प्रकरणीही सिध्दरामय्यांनी प्रतिक्रिया नोंदवत मानती ईश्वरप्पा यांच्या विधानासंदर्भात त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. ‘ऑपरेशन कमळ’ च्या माध्यमातून हे सरकार सत्तेवर आले असून जनतेच्या आशिर्वादावर हे सरकार सत्तेत आले नाही अशी टीकाही त्यांनी केली. हे सरकार निष्क्रिय आणि भ्रष्ट असे असल्याचेही ते म्हणाले.

आमच्याच सरकारच्या काळात अंमलात आणलेल्या योजनांची नावे बदलून नवी नावे देण्यात आल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले. बापूजी सेवा केंद्राचे नाव ग्राम वन असे करण्यात आले, कोविड मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन देखील या सरकारने केले नाही. बेरोजगारीसंदर्भात कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. राज्य, देश हा कर्जात आहे. परंतु आर्थिक स्थितीचा उल्लेख भाषणात करण्यात आला नसल्यासंदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

राज्यपालांच्या भाषणावर कडक ताशेरे ओढत हे भाषण म्हणजे सरकारचे खोटे असल्याची टीका विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली आहे.

Tags: