पाकव्याप्त काश्मीरबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्या ह्युंडाई कंपनीच्या विरोधात विजापुरातील एका युवकाने अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे.

पाकव्याप्त काश्मीरबाबत पाकिस्तानच्या बाजूने ट्विट करून भारताच्या विरोधात भूमिका घेतल्याने ह्युंडाई कंपनीच्या विरोधात सध्या देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विजापुरातील संतोष चौधरी या युवकानेही आपल्या ह्युंडाई आय-१० कारच्या मागे व पुढे ‘या कंपनीची कार चालवण्यास मला लाज वाटते, जयहिंद असा फलक लावून त्याने ह्युंडाई कंपनीचा निषेध केला आहे. “I AM ASHAMED TO DRIVE THIS CAR WHICH IS AN ANTI-NATIONAL COMPANY” #JAI HIND अशा मजकुराचे स्टिकर त्याने आपल्या कारवर लावले आहे. याबाबत संतोषने प्रसारमाध्यमाना अधिक माहिती दिली.
निषेधाच्या त्याच्या या अनोख्या प्रदर्शनाचे विजापूर परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.


Recent Comments