Belagavi

शहापुरात सकाळी-सकाळी घर फोडून चोरी; दागिने लांबवले

Share

पाहुण्यांना सोडायला गेल्याची संधी साधत एका घरात चोरी केल्याची घटना बेळगावातील महात्मा फुले रोड, शहापूर येथे रविवारी सकाळी घडली. या चोरीत सोन्याचांदीचे दागिने चोरटयांनी लांबवल्या आहेत.

होय, महात्मा फुले रोड, शहापूर येथील उद्योजक सुनील विजापूर यांच्या घरी आज सकाळी ८.३० च्या सुमारास ही चोरी करण्यात आली. आज सकाळी विजापूर हे आपल्या पाहुण्यांना सोडण्यासाठी कोगनोळी येथे गेले होते. ही संधी साधून दोघं चोरटयांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचांदीचे दागिने लुटून नेले. याबाबत संशय आल्यावर शेजाऱ्यांनी विजापूर याना तसेच शहापूर पोलिसांना याची माहिती दिली. त्यामुळे सुनील विजापूर अर्ध्या वाटेतूनच घरी परत आले. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Tags: