त्या गावात पंचकल्याण महोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहतोय. हत्ती–घोड्यांसह सवाद्य मिरवणूक लोकांचे लक्ष वेधून घेतेय. कुठले हे गाव असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? मग पहा हा विशेष रिपोर्ट…

एकीकडे हत्तीवर दाम्पत्यांची जम्बो सवारी तर दुसरीकडे घोड्यावर बसलेली चिमुकली मुले, अन त्यांच्या स्वागतासाठी उभ्या बालिका जणू इंद्रलोकच भूतलावर अवतरला की काय असे वाटतेय ना? होय, हे व आहे चिक्कोडी तालुक्यातील चंदूर ! ही दृष्ये आहेत तेथे ११ ते १५ फेब्रुवारी पर्यंत भरविण्यात आलेल्या जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सवाची. या महोत्सवात माजी आ. कल्लाप्पा मग्गेन्नावर यांनी सपत्नीक जैन धर्माच्या ध्वजाचे रोहण केले. 
तत्पूर्वी चांदूरमधील जैन बस्तीपासून महोत्सव स्थळापर्यंत भगवान बाहुबली यांच्या मूर्तीची हत्ती-घोड्यांसह मिरवणूक काढण्यात आली. विद्याभूषण महाराजांच्या डोक्यावरून बाहुबलींची मूर्ती गाणी गात, नृत्य करत महोत्सवस्थळी आणून प्रतिष्ठापना करण्यात आली.
या पंचकल्याण महोत्सवाचे उदघाटन माजी आ. कल्लाप्पा मग्गेन्नावर यांच्यासह जैन समाजाच्या विविध मान्यवरांनी दीप प्रज्वलनाने केले. पुरुष-महिला, मुले आणि युवकांनी बाहुबली यांच्या मूर्तीला नमन केले. यावेळी इंद्र धरणेंद्र, इंद्राणी, श्रीदेवी, ध्वतीदेवी, बुध्दीदेवी आदींच्या वेशात श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.
यावेळी जैन समाजाचे नेते अप्पासाब जमदाडे, सागर पट्टणकुडे, अनंत पट्टणकुडे, भरत मदभावे, अनिल बिंदगे, अनिल हिरेकुडे, सुकुमार बेडगे, बाळू चौगुले, अशोक जमदाडे, पिंटू जमदाडे आदी उपस्थित होते.
डी. के. उप्पार, आपली मराठी, चिक्कोडी


Recent Comments