Belagavi

हिजाब हा काँग्रेसचा छुपा अजेंडा हिजाब वरून काँग्रेसचे हीन राजकारण इराण्णा कडाडी यांचा आरोप

Share

हिजाब हा काँग्रेसचा छुपा अजेंडा असून शालेय विद्यार्थ्यांमध्ये धर्माच्या नावावर विष पेरण्यात येत असल्याचा आरोप राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केलाय.

बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना कडाडी म्हणाले, राज्यात हिजाब वरून सुरु झालेल्या वादाला काँग्रेस कारणीभूत आहे. हिजाब हा काँग्रेसचा छुपा अजेंडा आहे. विद्यार्थ्यांमध्ये हिजाब विषयावरून विष पेरण्याचे काम करण्यात आले आहे. हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. शाळा परिसरात राजकारण न करता, धर्माचे विष न पेरता शिक्षणाला संधी द्यावी. समाजस्वास्थ्य बिघडवण्याचे कार्य कॉग्रेस करत आहे. हा गुन्हा अदखलपात्र आहे असे कडाडी म्हणाले.

हिजाब केसरी वादासंदर्भात बोलताना कडाडी पुढे म्हणाले, सोशल मीडियाचा दुरुपयोग करून हे वाद पसरविण्यात येत आहेत. शाळा महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांकडून टूल किट चा वापर करण्यात आला आहे हे जगजाहीर झाले आहे. सरकारच्या निदर्शनास हि बाब आणून देण्यात आली असून काँग्रेसने हीन राजकारण करणे थांबवावे असा सल्ला त्यांनी दिलाय. (बाईट)

Tags: