Nippani

निपाणी परिसरातील नियमबाह्य वाहने जप्त

Share

अलीकडच्या काळात निपाणी परिसरातील दुचाकी, चारचाकी वाहनांच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. आज निपाणी शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षिका कृष्णवेणी गर्लहोसूर यांच्या नेतृत्वाखाली निपाणी येथील मोक्याच्या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी बेकायदेशीर रित्या वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करत अनेक वाहने जप्त करण्यात आली आहेत.

निपाणी शहराची लोकसंख्या पाहता सध्या हे शहर तालुका पातळीवरील असल्याचे निदर्शनास येत आहे. दिवसेंदिवस येथील रहदारी वाढत चालली असून याप्रमाणे अनेक बेकायदेशीर गोष्टीही घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. अलीकडच्या काळात निपाणी परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आज निपाणी शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षिका कृष्णवेणी गर्लहोसूर यांच्या नेतृत्वाखाली निपाणी येथील मोक्याच्या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी बेकायदेशीर रित्या वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करत अनेक वाहने जप्त करण्यात आली आहेत. ज्या वाहनांचे नंबरप्लेट्स नाहीत, ज्यांच्या वाहनांचे इन्शुरन्स भरलेले नाहीत, किंवा इतर नियमबाहस्य कारणासह वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत अनेक वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

निपाणी बसस्थानकापासून बेळगाव नाका, अशोकनगर परिसर, चन्नम्मा परिसर, कोठीवाले कॉर्नर, चन्नम्मा सर्कल आसपासचा परिसर, स्टेट बँक ऑफ इंदिरा समोरील मार्ग याठिकाणी वाहनचालकांना थांबवून चौकशी करण्यात आली. याचप्रमाणे निपाणी पोलीस स्थानकांच्यावतीने निपाणी शहरातील अतिक्रमण हटाओ मोहीम देखील हाती घेण्यात आली होती.

जुन्या छत्रपती संभाजी महाराज चौकापासून बेळगाव नाक्यापर्यंतच्या दोन्ही रस्त्यांवरील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अशातच अतिक्रमण वाढल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय या परिसरात अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. अशा ठिकाणी पोलिसांच्यावतीने आज अतिक्रमण हटाओ मोहीम हाती घेण्यात आली होती.

सबइन्स्पेक्टर कृष्णवेणी गर्लहोसूर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने निपाणी शहरात आज सदर कारवाई हाती घेण्यात आली होती. यावेळी वाहन चालक, व्यापाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. निपाणी शहराला स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपले योगदान देणे गरजेचे असल्याचेही यावेळी शहरवासीयांना सांगण्यात आले.

Tags: