Belagavi

केपीटीसीएल-हेस्कॉमतर्फे महिला कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट स्पर्धा

Share

कर्मचाऱ्यांमधील मानसिक ताणतणाव दूर करून शारीरिक तंदुरुस्ती राखण्याच्या हेतूने केपीटीसीएल आणि हेस्कॉमच्या वतीने बेळगावात महिला कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

होय, बेळगाव शहरात केपीटीसीएल आणि हेस्कॉमच्या वतीने शुक्रवारी महिला कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांमधील मानसिक ताणतणाव दूर करून शारीरिक तंदुरुस्ती राखण्याच्या हेतूने या स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ओनिके ओबाव्वा, कित्तूर राणी चन्नम्मा, राणी अब्बका आणि झाशी की राणी हे चार संघ सहभागी झाले होते.

ओनिके ओबाव्वा संघाच्या कप्तानपदाची धुरा सुमंगल यांनी, कित्तूर राणी चन्नम्मा संघाची अपर्णा यांनी, राणी अब्बका संघाची संघमित्रा यांनी तर झाशी की राणी संघाच्या कप्तानपदाची धुरा फिरदौस यांनी सांभाळली.

अंतिम सामन्यात विजय मिळवून ओनिके ओबाव्वा संघाने ही स्पर्धा जिंकली. या संघात नागरत्ना होसल्ली, वैशाली, नेत्रावती, शामल, सपना, मंजुळा के, लक्ष्मी कोले आणि रेणू हनपुरे यांचा समावेश होता.

Tags: