शेतकऱ्यांसाठी त्याचे खरे धन म्हणजे त्याची शेती असते. ती शेती कितीही असो परंतु मातीतून सोने पिकवण्याची क्षमता केवळ शेतकरीच बाळगू शकतो. विजापूरमधील अशाच एका शेतकरी दाम्पत्याने १ एकर क्षेत्रफळातील शेतात लाखोंचे रेशन उत्पादन घेऊन मोठे यश मिळविले आहे.

विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील मदगुणकी गावातील शेतकरी दाम्पत्याने अवघ्या एक एकर जागेत रेशमी उत्पादन घेतले आहे. या उत्पादनाच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न हे शेतकरी दाम्पत्य घेत आहेत. ज्या शेतात रेशमाचे उत्पादन घेतले जात आहे तेथे अधिकाऱ्यांनी भेटी देखील दिल्या आहेत. गदीगेप्पा केंभावी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सुरुवातीला शेंगा, गहू, जोंधळा अशी पिके या शेतजमिनीत घेतली जायची. .
या पिकासाठी लागणार खर्च अधिक असल्याने १ एकर शेत जमिनीत रेशमी उत्पादन घेण्याचे या शेतकऱ्याने ठरविले पत्नी प्रेमा यांच्या साथीने सध्या रेशम उत्पादन मोठया जोमात घेतले जात आहे. शिवाय आधीच्या पिकांपेक्षा रेशम उत्पादनातून लाखोंचे उत्पन्न मिळत असल्याचे शेतकरी दाम्पत्याचे म्हणणे आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजनेंतर्गत १ लाख रुपयांचे अनुदान या शेतकऱ्याला मिळाले आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विकासकामे केली होती. यानुसार अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना आता या योजनेंतर्गत त्यांचे पीक घेण्यासाठी अनुदान मिळू शकते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे असे मत बबलेश्वर तालुका पंचायत एमजीएनआर इ जी च्या सहायक संचालिका भारती हिरेमठ यांनी व्यक्त केले.
गदीगेप्पा केंभावी या शेतकऱ्याने केलेल्या या शेतीच्या नव्या प्रयोगाचे इतर शेतकऱ्यांनी अनुकरण करून आपल्या उत्पन्नात वाढ करून घेणे आदर्शवत आहे.
विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजापूर


Recent Comments