Khanapur

पाऊले चालती पंढरीची वाट ! माघी वारीसाठी नंदगडचे वारकरी विठुरायाच्या भेटीला 

Share

 विठूरायाचा अखंड जयघोष करत, भजने गात नंदगडच्या वारकऱ्यांनी आज माघवारीसाठी पंढरपूरला प्रस्थान केले.

होय, खानापूर तालुक्यातील नंदगड गावाला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. दरवर्षी प्रत्येक एकादशीला नित्यनियमाने जाण्याची परंपरा  जपली आहे. आता माघी वारीनिमित्त गावातील वारकऱ्यांनी आज, गुरुवारी लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरीकडे प्रस्थान केले. गावातील लक्ष्मी मंदिरासमोर देवीचे व वाहनाचे पूजन करून गावकऱ्यांनी त्यांना निरोप दिला. यावेळी वारकरी आणि गावकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या साथीने भजने गायिली.

यावेळी ग्रामदेवता लक्ष्मीदेवी मंदिर यात्रा महोत्सवाचे अध्यक्ष पी. के. पाटील म्हणाले, दरवर्षीप्रमाणे आज नंदगड गावातील वारकरी माघी वारीनिमित्त पंढरपूरला जात आहेत. त्यांना गावातर्फे निरोप देण्यात आला आहे. विठ्ठलाकडे त्यांनी गावातील लोकांचे चांगले आयुष्य आणि आरोग्यासाठी प्रार्थना करावी, त्यांची वारी यशस्वी व्हावी अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी नंदगड ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष मन्नूर तहसीलदार, सदस्य नागेंद्र पाटील, संदीप पारिशवाडकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

Tags: