ऊस उतरवून चाललेल्या ट्रॅक्टरने थांबलेल्या डंपरला धडक दिल्याने ट्रॅक्टरचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात निपाणी तालुक्यातील बोरगावमध्ये झाला.
शिरगुप्पी येथील रहिवासी प्रकाश हावीनाळ असे जखमी चालकाचे नाव असून, त्याच्यावर नजीकच्या महाराष्ट्रातील जयसिंगपूर येथील खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
ट्रॅक्टरचालक प्रकाश हे अकिवाटहून हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याला ऊस घेऊन गेले होते. तेथे ऊस उतरवून ते परत जात असताना बोरगावजवळ नाडगे गाद्याजवळ समोर थांबलेल्या डंपरला ट्रॅक्टरने धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, ट्रॅक्टरच्या समोरील भागाचे २ तुकडे झाले. अपघातात चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच जवाहर कारखान्याच्या बोरगाव कृषी कचेरीतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जवाहर कारखान्याच्या रुग्णवाहिकेतून जखमी प्रकाश याना जयसिंगपूरमधील खासगी इस्पितळात दाखल केले. सदलगा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
Recent Comments