Vijayapura

इंडीत गुरुबसव कॉलेजला पोलीस बंदोबस्त

Share

 हिजाबभगवा वादातून राज्यातील शाळामहाविद्यालयांना सुटी जाहीर केली असली तरी विजापूर जिल्ह्यातील इंडीतील गुरुबसव कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या कॉलेज परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

राज्यात हिजाब विरुद्ध भगवा असा वाद पेटल्याने हायस्कुल व कॉलेजना ३ दिवस सुटी देण्यात आली आहे. तरीही इंडीतील गुरुबसव कॉलेजने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी कॉलेज बाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कॉलेजच्या वाहनातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसह अन्य वाहनातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करूनच आत प्रवेश देण्यात येत आहे.

 

Tags: