राज्यात सुरु असलेल्या हिजाब वर्सेस केसरी वादावर हरिहर पिठाचे श्री वचनानंद स्वामी यांनी प्रतिक्रिया नोंदविली असून शाळा महाविद्यालयात समान पोशाख असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. राज्यात सुरु असलेल्या या वादात सरकारने घेतलेल्या भूमिकेचेही त्यांनी स्वागत केले.

वाचनानंद श्री बोलताना म्हणाले कि आधीच कोविड काळात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अशातच राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये गणवेशावरून सुरु असलेल्या वादामुळे या नुकसानीत आणखीन भर पडत आहे. यादरम्यान सरकारने शाळा आणि महाविद्यालयांना तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, असे मत वचनानंद स्वामींनी व्यक्त केले.
वचनानंद स्वामी पुढे म्हणाले, शाळेत प्रत्येकाने एकसमान गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. सर्वांसाठी समान पोशाख हि कल्पना योग्य असून शाळा – महाविद्यालयात शिक्षण हाच एकमेव धर्म असणे गरजेचे असल्याचे मत स्वामींनी व्यक्त केले. शाळेत देण्यात येणारे शिक्षण एक, शिक्षक एक तर मग हा धर्माचा तेढ कशासाठी असा प्रश्न उपस्थित करत शाळेत केवळ शिक्षण आणि संस्कार आत्मसात करण्यासाठी आपण जावे असे स्वामीजी म्हणाले.
अचानक उद्भवलेल्या या वादासंदर्भात बोलताना स्वामीजी म्हणाले, या वादामागे अनेक कारणे आहेत. आधीच कोविडमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. हिजाब परिधान करणे हे त्यांच्या धर्मानुसार योग्य आहे. परंतु शाळा – महाविद्यालयात सर्वधर्मसमभाव या भावनेने समान पोशाख परिधान करणे आवश्यक आहे. अशा कारणावरून स्पर्धा करण्याऐवजी स्पर्धात्मक परीक्षा, आणि इतर महत्वाच्या विषयावर अव्वल येऊन कर्नाटकचे नाव उंचावणे गरजेचे असल्याचे स्वामीजी म्हणाले. कर्नाटकातील विद्यार्थ्यांनि आयएएस मध्ये यश मिळवावे, स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवावेत. शाळेत शाळेचा आणि शिक्षणाचा धर्म पाळावा आणि मंदिर, मस्जिद, चर्च आणि आपल्या धर्माच्या प्रार्थनास्थळी आपल्या धर्माची तत्वे पाळावीत असा सल्ला स्वामीजींनी दिला. शिवाय हिजाब आणि केसरी वाद सरकार योग्य रीतीने हाताळत असल्याचेही स्वामीजी म्हणाले.


Recent Comments