Ramdurg

वसतिगृहातील जेवणानंतर १३ विद्यार्थिनी अत्यवस्थ

Share

 वसतिगृहात भोजन केल्यावर १३ विद्यार्थिनी अत्यवस्थ झाल्याची घटना रामदुर्गमध्ये घडली.

होय, रामदुर्ग शहरातील समाज कल्याण खात्याच्या मॅट्रिकोत्तर विद्यार्थिनी वसतिगृहात वाढण्यात आलेले जेवण केल्यानंतर १३ विद्यार्थिनी अत्यवस्थ झाल्या. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थिनींसाठीचे हे वसतिगृह आहे. हॉस्टेलच्या स्वयंपाक घरात शिजविलेले अन्न त्यांना वाढण्यात आले. ते घेतल्यानंतर १३ विद्यार्थिनी अत्यवस्थ झाल्या.

त्यांना रामदुर्ग सरकारी आणि खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. ४ विद्यार्थिनींवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे अशी माहिती रामदुर्गच्या तहसीलदारांनी दिली आहे. दरम्यान वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जावर विद्यार्थिनींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चांगल्या दर्जाचे जेवण तेथे दिले जात नसल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी केला आहे.

 

Tags: