गेल्या २ वर्षांत कोरोनासह विविध आव्हानांचा समर्थपणे सामना करत जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आहे असे गौरवोद्गार माजी महापौर एन. बी. निर्वाणी यांनी काढले.

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी रामतीर्थनगर रहिवासी संघ, कुंदरनाड रहिवासी क्षेमाभिवृद्धी संघ, स्नेह समाजसेवा संघ, माळमारुती वसाहत रहिवाशी संघ, वन्यजीव परिसर अभिवृद्धी वेदिके आदींच्या सहयोगाने जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी महापौर निर्वाणी म्हणाले, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता, सर्वाना समान संधी देऊन, स्मार्ट सिटीची कामे वेगाने करवून घेत शहराचा व जिल्ह्याचा विकास साधत लोककल्याणाची कामे करत जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे. असा अधिकारी जिल्ह्याला दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो.
सत्काराला उत्तर देताना जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, सरकार देत असलेल्या सुविधा बेळगाव शहर आणि जिल्ह्याला देण्यात स्थानिक नेत्यांचे, समाजप्रमुखांचे चांगले सहकार्य लाभत आहे. पुढील काळातही सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधू असे सांगितले.
यावेळी ऍड. एन. आर. लातूर, बी. सी. यरझरवी, सुरेश उरबिनहट्टी, बसवराज गौडप्पगोळ, डॉ. डी. एन. मिसाळे, प्रा. मारुती कदम, जगदीश मठद, विलास केरूर, इरण्णा कट्टावी, वाय. एस. गडिनाइक, व्ही. ए. ग्णाचारी एम. टी. पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments