राज्यात हिजाब विरुद्ध भगवा असा वाद निर्माण करून काँग्रेसने शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत विष बीज पेरले आहे असा आरोप भाजप राज्य उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केला.

बेळगावात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना विजयेंद्र म्हणाले, राज्यात हिजाब विरुद्ध भगवा असा वाद निर्माण करून काँग्रेसने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत विष बीज पेरले आहे हे दुर्दैवी आहे. विध्यार्थ्यानी गणवेश घालून शाळा-महाविद्यालयात जाणे ही परंपरा आधीपासून चालत आली आहे. गणवेश या नावातूनच सारे काही स्पष्ट होते. शाळेत सर्व विध्यार्थी समान असले पाहिजेत. तेथे जात-पात असू नये. हिंदू-मुस्लिम विचार असू नये. शाळा-महाविद्यालयात विध्यार्थ्यानी विध्यार्थी बनूनच राहि ले पाहिजे. परंतु काँग्रेस नेते हिजाबच्या मुद्यावरून राजकारण करत आहेत. या मुद्यावरून विद्यार्थ्यांमध्ये ते वीषबीज पेरत आहेत हे निषेधार्ह आहे. यापासून त्यांनी दूर रहायला हवे असे विजयेंद्र म्हणाले. 
विकासकामे न केल्याने निवडणुकीच्या वर्षात भाजप राजकारण करत असल्याच्या आरोपावर विजयेंद्र म्हणाले, राज्यात आणि केंद्रात कशाप्रकारे विकास झाला आहे हे जनतेला माहित आहे. जनताच त्यावर निवडणुकीत प्रतिक्रिया देईल. दोन्ही सरकारच्या विकासाच्या कामगिरीवरच भाजप निवडणुकीला सामोरे जाईल. हिजाबच्या मुद्यावरून राजकारण करणे भाजपच्या तत्वात बसत नाही. ते काँग्रेसचे काम आहे. भाजप त्यात नाक खुपसणार नाही.
विरोधी पक्षावर टीकेची झोड उठवताना विजयेंद्र म्हणाले, गणवेशावरून यापूर्वी कधीच असा गोंधळ माजला नव्हता. याला राजकीय रंग देऊन देशभर गोंधळ माजवण्याचे काम विरोधी पक्ष करत आहे. शाळा-महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी यावरून गोंधळून जाऊ नये. शाळा कॉलेजात एकाच बाकावर बसून सर्व जाती-धर्माचे विध्यार्थी शिक्षण घेतात. काँग्रेस यावरून राजकारण करतो म्हणून डोके बाद करून घेऊ नये. विध्यार्थ्यानी शांत राहून शिकण्याचे कर्तव्य पार पाडावे असे विजयेंद्र यांनी सांगितले.


Recent Comments