हिजाब वरून सुरु झालेला वाद न्यायालयापर्यंत पोहोचला असून राज्यात यावरून संघर्ष सुरु झाला आहे. न्यायालयाने त्वरित यावर निकाल द्यावा, आणि न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आणि आदेशाचे सर्वांनी पालन करावे, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केली आहे.

हिजाब वादावरून राज्यात संघर्ष निर्माण झाला असून शाळा महाविद्यालयांना एक आठवडा सुट्टी जाहीर करावी असा आग्रह त्यांनी केलाय. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत महाविद्यालयांना सुट्टी देण्यात यावी. हा वाद जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला असून समाजात अशांतता निर्माण करण्याचा काहींचा हेतू असल्याचे यत्नाळ म्हणाले.
राज्याची शांतता भंग करण्यासाठी हिजाब वाद उकरून काढण्यात आला आहे. यामागे काँग्रेसचा हात आहे. देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी केलेले हे षडयंत्र आहे. काँग्रेसचा देशविरोधी संघटनांना पाठिंबा आहे. असा आरोप बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला.
देशात एकहाती सत्ता असल्याने काँग्रेस अशा पद्धतीने वागत आहे. जाणीवपूर्वक अशी षड्यंत्रे रचण्यात येत आहेत असे सांगत यत्नळांनी मुस्लिमांना देश भक्ती नसल्याचा आरोप करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. मुस्लिम समाजात देशभक्ती आपण पहिली नाही. वक्फ बोर्ड, काश्मिरी ३७०, अल्प संख्यांक आयोगाकडून त्यांना अनेक निधी दिले जात असून देखील त्यांचे वागणे बदलत नाही. त्यांचा संविधानावर विश्वास नाही. आणि ज्यांचा संविधानावर विश्वास नाही त्यांना या देशात राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे यत्नाळ म्हणाले.
काँग्रेस नेत्यांवर बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी जोरदार टीका केली असून ज्यांचा संविधानावर विश्वास नाही अशा लोकांनी भारतात राहू नये असा सल्लाही यत्नळांनी दिला.


Recent Comments