Khanapur

तमिळनाडू काँग्रेस सहायक निवडणूक अधिकारीपदी आ. डॉ. अंजली निंबाळकर

Share

 खानापूरच्या . डॉ. अंजली निंबाळकर यांची तमिळनाडू काँग्रेसच्या असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर अर्थात सहायक निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एआयसीसीने तसा आदेश काढला आहे.

खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांची पक्षनिष्ठा आणि पक्षासाठी त्यांनी केलेले प्रामाणिक कार्य याची दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने तमिळनाडू काँग्रेसच्या असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर अर्थात सहायक निवडणूक अधिकारीपदी त्यांची नियुक्ती केली आहे. सध्या पक्षाने गोवा राज्यातील निवडणुकीच्या प्रभारीपदी नियुक्ती केल्याने आ. डॉ. निंबाळकर गोव्यात पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय आहेत.

 

 

Tags: