Accident

डंपरने दुचाकीला धडक दिल्याने महिला जागीच ठार

Share

 डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जनवाडची महिला जागीच ठार झाली. हा अपघात रविवारी रात्री .३० च्या सुमारास चिक्कोडी तालुक्यातील बोरगावसदलगा मार्गावर झाला.  

जनवाड गावची अंजना राजू मदरसे, वय ५२ असं या अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. अंजना व तिचा पती राजू मदरसे दुचाकी वाहनावरून मुलीला भेटण्यासाठी चिक्कोडीला जात होते. त्यावेळी बोरगावहून सदलगाकडे जाणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर मागे बसलेल्या अंजना खाली पडून डंपरच्या चाकाखाली आल्या आणि जागीच ठार झाल्या तर पती राजू मदरसे हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच जनवाडच्या लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. अंजना यांच्या मागे पती, २ मुलगे, २ मुली सुना, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे. सदलगा पोलीस ठाण्याचे पीएसआय रवींद्र अज्जनावर यांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदलगा सरकारी इस्पितळात उत्तरीय तपासणीनंतर अंजना यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

 

Tags: