रायचूर येथे प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान करणाऱ्या न्या. मल्लिकार्जुन गौड यांच्या निषेधार्थ हुक्केरीतील मुस्लिम संघटना ग्यारह जमाततर्फे निदर्शने करण्यात आली.

रायचूर येथे प्रजासत्ताक दिन समारंभात तेथील जिल्हा न्या. मल्लिकार्जुन गौड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा काढण्यास सांगून त्यांचा अवमान केला होता. त्यामुळे संपूर्ण देशाची मान शरमेने खाली गेली आहे असा आरोप करून हुक्केरीतील जमात सदस्यांनी न्या. गौड याना सेवेतील बडतर्फ करण्याची मागणी करत निदर्शने केली. न्या. गौड याना देशातून हाकलून द्यावे अशी मागणीही निदर्शकांनी यावेळी केली. यावेळी ग्यारह जमातच्या सदस्यांनी माशाबी दर्ग्यापासून मिनी विधानसौधपर्यंत निषेध मोर्चा काढला. त्यानंतर तहसीलदारांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले.
यावेळी ग्यारह जमातचे सदस्य सलीम नदाफ, शब्बीर सनदी, सलीम कलावंत, कबीर मलिक, डी. आर. काजी, इर्शाद मोकाशी, जाफर मालदार, सुनील भैरन्नावर, मेहबूब अत्तार आदी उपस्थित होते.
Recent Comments