Vijayapura

हिजाब युक्ती हे काँग्रेसचे गिमिक! काँग्रेसचे तीन गटात विभाजन! भाजप आमदार दुर्योधन ऐहोळे यांची टीका

Share

राज्यात सध्या हिजाब प्रकरणी बरीच चर्चा रंगत असून यासंदर्भात भाजप आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी हे प्रकरण म्हणजे काँग्रेसचे गिमिक असल्याची टीका केली आहे.

भाजप आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली असून राज्यात सुरू असलेले हिजाब प्रकरण हे काँग्रेसचे निवडणुकीचे गिमिक असल्याचे म्हटले आहे.

प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना दुर्योधन ऐहोळे म्हणाले राज्यात काँग्रेसमध्ये विभाजन झाले असून सध्या राज्यात सुरू असलेले हिजाब प्रकरण हे काँग्रेसचे गिमिक आहे. परंतु सध्या जनता जागी झाली असून काँग्रेसचे हे तंत्र यशस्वी होणार नसल्याचे ऐहोळे यांनी सांगितले.

डीकेशी, परमेश्वर आणि सिद्धरामय्या या तिघांमध्ये काँग्रेसचे विभाजन झाले असून हिजाब प्रकरण काँग्रेसला वर्काउट होणार नसल्याची टीका ऐहोळे यांनी केली. 2023 साली होणाऱ्या निवडणुकीत 130 जागांवर भाजपाचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त करत पुढील निवडणुकीत मुख्यमंत्रीपदी भाजपाचा नेता विराजमान होणार असल्याचा विश्वास दुर्योधन ऐहोळे यांनी व्यक्त केला. याबरोबरच काँग्रेस मधील गटातटामुळे काँग्रेस पक्ष संपुष्टात आल्याचेही दुर्योधन ऐहोळे म्हणाले.

Tags: