बॉक्साइट रोडवरील श्री महालक्ष्मी देवस्थानच्या १२व्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र बी वाय विजयेंद्र यांनी देवस्थानाला सदिच्छा भेट दिली.

बॉक्साइट रोडवर असलेल्या श्री महालक्ष्मी देवस्थानाचा १२ वा यात्रोत्सव ३० जानेवारीपासून सुरु झाला आहे. ३० जानेवारी ते १० फेब्रुवारी पर्यंत साजऱ्या होणाऱ्या यात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली सहस्त्र चण्डियाग, भगवद्गीता तसेच सिद्धांत शिखामणी प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी मोफत सामूहिक विवाह, मंगळवारी सहस्त्र चण्डियाग पूर्णाहुती, गुरुवारी सामूहिक ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चन तसेच देवीचा ओटी भरणे कार्यक्रम, विशेष पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
महालक्ष्मी देवस्थान कमिटीचे सतीश माळवदे यांनी बोलताना सांगितले, मंगळवारी होणाऱ्या सहस्त्र चण्डियाग पूर्णाहुती कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे सुपुत्र बी वाय विजयेंद्र हे सहभागी होणार आहेत. शिवाय भक्तांनी देवस्थानाला भेट देऊन दर्शन आणि इतर कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सलग १२ दिवस आयोजित करण्यात आलेल्या या यात्रोत्सवात विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले असून भक्तांनी सर्व धार्मिक विधी आणि देवी दर्शनाला लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.


Recent Comments