Belagavi

खासगी भाजीमार्केट बंद करण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण : सिदगौडा मोदगी

Share

 बेळगावात बेकायदेशीरपणे उभारलेले जयकिसान भाजी मार्केट बंद करण्याच्या मागणीसाठी मी एकटाच आमरण उपोषण करणार आहे अशी माहिती शेतकरी नेते सिदगौडा मोदगी यांनी दिली.

बेळगावात रविवारी एपीएमसी आवारात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिदगौडा मोदगी म्हणाले, सरकारने जयकिसान भाजीमार्केट बंद न केल्यास, उद्यापासून तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यात मी एकटा बेमुदत आमरण उपोषण करणार आहे.

बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेले जयकिसान भाजीमार्केट बंद करण्याच्या मागणीसाठी आम्ही निरंतर आंदोलन करत आहोत. मात्र सरकारने अद्याप यावर कोणतीही पावले उचललेली नाहीत. तातडीने सरकारने एपीएमसी वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे. खासगी मार्केट बंद पाडण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यात येत आहे. मात्र सरकार आमच्या आंदोलनाला प्रतिसाद देत नसल्याने आता आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे असे मोदगी यांनी सांगितले.

एकंदर, खासगी भाजीमार्केट बंद पाडण्यासाठी सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकार प्रतिसाद देत नसल्याने सिदगौडा मोदगी यांनी एकट्यानेच बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. किमान आतातरी या प्रश्नाकडे सरकार गांभीर्याने पाहणार का हाच खरा प्रश्न आहे.

 

 

Tags: