Hukkeri

हुक्केरीत उत्तरायण कार्यक्रम उत्साहात

Share

 मुलांनी अभ्यासाबरोबरच खेळांमध्ये सुद्धा रस घेतला पाहिजे, आपली संस्कृती, संस्कार काय आहेत हे जाणून घेतले पाहिजेत असे एसडीव्हीएस संस्थेच्या संचालिका मीनाक्षी पाटील यांनी सांगितले.

हुक्केरीतील रवदि फार्महौसमध्ये आज आयोजित उत्तरायण-२०२२ कार्य्रक्रमाचे उदघाटन कल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. संकेश्वर शहरातील श्री दुरदुन्डेश्वर विध्यावर्धक संघाच्या अंतर्गत कार्यरत विविध शाळांमध्ये उत्तरायणनिमित्त पतंगोत्सव आणि मातांची ओटी  भरण्याचा कार्य्रक्रम आयोजित केला होता . यामागचा हेतू म्हणजेच मुलांना आपली संस्कृती आणि संस्काराची माहिती घडविणे. त्याचप्रमाणे कॉलेज विध्यार्थ्यांकरिता कौशल विकास गतिविधी आयोजित केला जात आहे. यामुळे  विद्यार्थ्याच्या भवितव्याला मदत होईल. विद्यार्थ्याना आपले स्वयंउद्योग सुरु करण्याकरिता त्यांची अभिरुची वाढविण्याचे काम केले  जात असल्याची माहिती एसडीव्हीएस संघाचे अध्यक्ष ए. बी. पाटील यांनी दिली.

यानंतर मुलांनीं मोठ्या उत्साहाने पतंग उडविले. कार्यक्रमाचे नेतृत्व केलेल्या सर्वमंगला यरगट्टी यांनी आधी  आमच्या महाविद्यालयात लक्ष्य अकादमी सुरु करण्याबरोबर विध्यार्थ्यासाठी ‘कमवा व शिका’ योजना आखली  असून, त्याचा सदुपयोग करून घेण्याचे आवाहन केले.

यावेळी विध्यार्थी आणि माता यांनी पारंपरिक वेशात उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी प्रशासकीय अधिकारी बी. ए. पुजेरी, उषा रवदि, अनुपमा बागलकोट, रेखा चिक्कोडी, शोभा पाटील, सरोजिनी हुंडेकर, राजश्री पाटील, गुरुदेव हुल्लेपनवरमठ, लीला राजपूत, सविता एनगीमठ, आदी उपस्थित होते.

 

 

Tags: