कर्नाटकचे कबीर, पद्मश्री इब्राहिम सुतार यांच्या निधनाने संपूर्ण कर्नाटकावर शोककळा पसरली आहे. त्यांचे जन्मगाव महालिंगपूरमध्ये नीरव शांतता पसरली आहे.

सर्वधर्म समभावाचे बीज समाजात रोवून जातीय सलोख्याचा संदेश देणारे प्रसिद्ध प्रवचनकार पद्मश्री पुरस्कार विजेते इब्राहिम सुतार यांचे बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर येथे आज सकाळी निधन झाले. त्यामुळे बागलकोट जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. सामाजिक सौहार्दाचे केंद्र बनलेल्या त्यांच्या महालिंगपूर येथील घरात कुटुंबीयांसमवेतच नागरिकही इब्राहिम सुतार यांच्या पार्थिवासमोर अश्रू ढाळताना दिसून आले. 
इब्राहिम सुतार यांच्या निधनाने महालिंगपूर शहर शोकसागरात बुडाले आहे. जणू अघोषित बंद सारखी स्थिती शहरात दिसून आली. सर्व जाती-धर्माच्या लोकांची त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी रीघ लागली होती.



Recent Comments