Khanapur

खानापूर मध्ये प्रसूती रुग्णालय इमारतीचा स्लॅब भरणी कार्यक्रम

Share

खानापूर सार्वजनिक रुग्णालयाच्या आवारात एक भव्य असे नूतन प्रसूती रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयाचा स्लॅब भरणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते स्लॅब पूजन करण्यात आले.

खानापूर येथील सार्वजनिक रुग्णालयाच्या आवारात नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रसूती रुग्णालयाचा स्लॅब भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. सदर कार्यक्रमाला डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते चालना देण्यात आली काही महिन्यातच या रुग्णालयाचे काम पूर्ण होणार असून खानापूर भागातील महिलांसाठी हे रुग्णालय सोयीचे ठरणार आहे.

यावेळी बोलताना आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर म्हणाल्या, खानापूर तालुक्यात उभारण्यात येत असलेले प्रसूती रुग्णालय ही अभिमानास्पद बाब आहे. पंधरा कोटी रुपयांच्या खर्चातून साठ खाटांची क्षमता असलेले प्रसूती रुग्णालय उभारण्यात येत आहे. या कार्यासाठी सर्वांचे सहकार्य आणि आशीर्वाद अपेक्षित आहे. मी स्वतः एक स्त्रीरोग तज्ञ असल्याने ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पद असल्याचे डॉक्टर अंजली निंबाळकर म्हणाल्या. येत्या काही महिन्यातच या रुग्णालयाचे कामकाज पूर्ण होऊन रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा केला जाईल, अशी माहिती डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी दिली.

यावेळी तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर संजय नांद्रे यांच्यासह तालुक्यातील सरकारी रुग्णालयातील वैद्याधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Tags: