बेंगळुरातील गवीपुर श्री भवानी पीठाच्या गोसावी महासंस्थान मठाचे श्री मंजुनाथ स्वामीजींनी आज हुक्केरी येथील हिरेमठाला भेट दिली.

श्री भवानी पीठाच्या गोसावी महासंस्थान मठाचे श्री मंजुनाथ स्वामीजींनी आज हुक्केरी येथील हिरेमठाला भेट दिली. यावेळी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपला पुत्र श्रीज्योत आणि सासरे डॉ. सदानंद सरनोबत यांच्यासह स्वामीजींची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर स्वामीजींनी डॉ. सरनोबत यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि सरनोबत कुटुंबियांना आशीर्वाद दिले. श्री मंजुनाथ स्वामीजींचा पट्टाभिषेक सोहळा येत्या १० ते १४ फेब्रुवारी या काळात बेंगळूर येथे होणार आहे. त्यानिमित्त स्वामीजी राज्यातील प्रमुख मठ आणि संस्थानांना भेटी देत आहेत. 
यावेळी क्षत्रिय मराठा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप पवार, राहुल पवार, सचिव संजू भोसले, निरगलीमठ, बुडा अधिकारी एम. व्ही. हिरेमठ आदी उपस्थित होते.


Recent Comments