खानापूर–बिडी रस्त्यावर गुरुवारी ‘बर्निंग ट्रक‘चा थरार पहायला मिळाला. सायलेन्सर कट झाल्याने लागलेल्या आगीत संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

होय, खानापूर बिडी दरम्यानच्या रस्त्यावर आज सर्वाना ‘बर्निंग ट्रक’चा थरार पहायला मिळाला. सायलेन्सर कट झाल्याने लागलेल्या आगीत संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. प्राथमिक माहितीनुसार, या ट्रकचा सायलेन्सर कट झाला होता. त्यामुळे बिडीपर्यंत कसातरी ट्रक नेऊन तो दुरुस्त करून घ्यायचे म्हणू चालक ट्रक चालवत निघाला होता.
मात्र दुर्दैवाने रस्त्यातच अचानक ट्रकने पेट घेतला आणि बघता-बघता संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. नंदगड पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोवर ट्रकचा पुढील भाग ड्रायव्हर केबिनसह बेचिराख झाला होता. ट्रक मालकाबाबत माहिती मिळू शकली नाही. नंदगड पोलिसांनी याबाबत चौकशी सुरु ठेवली होती.


Recent Comments