अन्नाच्या शोधात दोन गवि रेडे अन्न मंत्र्यांच्या गावात ! शोधात जंगलातील दोन गवि रेडे अन्न मंत्र्यांच्या गावात आल्याची घटना घडली आहे.

होय, हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी गावातील शेतात २ गवि रेडे आढळून आले. एरव्ही जंगलात आढळणाऱ्या या प्राण्यांनी अन्नाच्या शोधात नागरी वस्तीत प्रवेश केल्याचे सिद्ध झाले आहे. बेल्लद बागेवाडी गावातील नेर्ली यांच्या शेतात हे प्राणी दिसताच ग्रामस्थांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रमेश माळगे या युवकावर एकाने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याच्यावर हुक्केरी सरकार इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
घटनास्थळी तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार, पशु चिकित्सा वैद्याधिकारी तात्यासाहेब देसाई, एस. व्ही. नाईक, वनाधिकारी सज्जन, बेल्लद यांनी भेट देऊन पाहणी केली. गवि रेडे पकडण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची सूचना त्यांनी वन कर्मचाऱ्यांना केली. गवि रेड्याना पकडण्याची मोहीम सुरु आहे. या पकडापकडीत १ गवि रेडा कालव्यातील पाण्यात पडला. त्यामुळे तो तरंगतानाचे दृश्य इन न्यूजच्या कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. एकंदर अन्नाच्या शोधात गवि रेडे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्र्यांच्या गावात आले हा एक योगायोग आहे.


Recent Comments