बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथील करडीगुद्दी नामक कुटुंबाला कर्जाची परतफेड करता न आल्याने सावकाराने सामानासह घराबाहेर काढल्याची घटना घडली आहे.

होय, रामदुर्ग येथील करडीगुद्दी नामक कुटुंबावर कर्जाची परतफेड करता न आल्याने दुर्धर प्रसंग ओढवला आहे. मौला अल्ताफ सुरकोड यांच्याकडून या कुटुंबाने २०१७मध्ये ९ लाख रुपये कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी त्यांनी आपले नातेवाईक विठ्ठल करडीगुद्दी यांच्याकडून २०१८ मध्ये १५ लाख रुपये कर्ज घेतले होते. ते फेडता न आल्याने या कुटुंबाला घराबाहेर काढल्याची घटना घडली आहे.

विठ्ठल करडीगुद्दी यांच्याकडे सदर घर २ वर्षांसाठी गहाण ठेवून घेतलेले कर्ज १५ लक्षणचे कर्ज करडीगुद्दी कुटुंबाला फेडता आले नव्हते. मात्र २ वर्षांची मुदत असूनही केवळ दोनच महिन्यांत विठ्ठल करडीगुद्दी यांनी हे घर पुंडलिक मेटी याना विकून टाकले असा आरोप आहे. त्यानंतर विठ्ठल करडीगुद्दी आणि पुंडलिक मेटी कुटुंबीयांनी करडीगुद्दी यांच्या घरात घुसून धमकावत सगळे संसारोपयोगी साहित्य घराबाहेर फेकून देत करडीगुद्दी कुटुंबियांना बाहेर काढले आहे. याबाबत तक्रार देऊनही पोलीस काणाडोळा करत असल्याची तक्रार करडीगुद्दी कुटुंबीयांनी केली आहे. फ्लो


Recent Comments